गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर) महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन दिन 2026 निमित्त आयोजित चंद्रपूर जिल्हा स्टेडियम येथील कार्यक्रमात दिनांक 16 10 2026 ला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सौ कविता गेडाम – मडावी मॅडम यांच्या शुभहस्ते व इतर प्रमुख पाहुण्याच्या तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन यांच्या उपस्थितीत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुऱ्याचे तालुका उपाध्यक्ष, दिनबंधू परिवार राजुरा सचिव, गेल्या सात वर्षापासून वृक्ष संवर्धन व वृक्षरोपण कार्य सातत्यपूर्ण सुरू ठेवून पर्यावरण रक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे राजुरा येथील वृक्षप्रेमी भास्कर सर यांचा पर्यावरण संवर्धन व जनजागृती या कार्यासाठी प्रशस्तीपत्र व भारताचे संविधान उद्देशिका भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजुरा शहरातील व परिसरातील नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त व इतर कार्यक्रमाचे अनुषंगाने त्यांना वृक्ष भेट देऊन व वृक्षरोपण करून नैसर्गिक समतोल राखण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे तसेच समता , बंधुत्व राष्ट्रीय अखंडता टिकवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे हा उद्देश ठेवून त्यांनी पर्यावरण प्रेमी व वृक्षप्रेमी म्हणून सत्कार केला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य उपासक तथा उपासिका, यांची उपस्थिती होती.

