ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण तसेच समारोप सोहळा थाटात संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण तसेच समारोप सोहळा थाटात संपन्न.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१८ ऑक्टोबर शिक्षण विभाग पंचायत समिती, राजुरा व ॲड. यादवऱाव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण व समारोप सोहळा गुरुवारी दि.१५ ऑक्टोबर रोजी ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
“शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष” या मुख्य मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आयोजित या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील बालवैज्ञानिकांनी एकूण ९८ नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि.१३ ऑक्टोबर ला विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन झाले तसेच १४ ऑक्टोबर ला शिक्षकांसाठी विशेष चर्चासत्र पार पडले. दि. १५ ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा वर्ग ६ ते ८ व वर्ग ९ ते १२ या दोन गटात घेण्यात आली त्याचे संचालन ज्योती गुरनुले विषय साधन व्यक्ती व देवेंद्र रहांगडाले विशेष शिक्षक यांनी केले. बक्षिस वितरण सोहळ्या करिता पंचायत समिती राजुराचे गटविकास अधिकारी डॉ.भागवत रेजीवाड अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून आपली संशोधनवृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविलेले पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड जोपासण्यासोबतच Al चे परिणाम व दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत सुरक्षित व जबाबदारीने करण्याचा मौल्यवान सल्ला दिला. तर गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी, विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. यावेळी पंचायत समिती राजुरा येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्री विशाल शिंपी, श्री सावनकुमार चालखुरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक तथा संयोजक प्रा. इर्शाद शेख तसेच प्रा.मकरंद मांढरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तीन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शनाचे अहवाल वाचन विशाल शिंपी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले. प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या प्रतिकृतींचे परीक्षण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला व गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रदर्शनातील प्रतिकृती चे परीक्षण गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूर येथील प्रा. वैभव हरणे, माउंट जूनियर सायन्स कॉलेज बामणीचे प्रा.राकेश साठोणे, शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्रा. भावना रागीट, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील प्रा. प्रशांत धाबेकर व प्रा. प्रभाकर कोल्हे तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख यांनी केले. परीक्षनांती निकाल जाहीर करण्यात आला यात प्राथमिक स्तरावर सर्वसाधारण गटातून स्टेला मॉरिस कान्व्हेंट(स्टेट)स्कूलची विद्यार्थिनी कु.जानवी कैलास विभुते हिने प्रथम, तर ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलची कु.तेजस्विनी गणेश चापले हिने द्वितीय तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धिडसी या शाळेतील विद्यार्थी प्रमोद दिलीप ढुमणे ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सर्वसाधारण गटातून माध्यमिक स्तरावर स्टेला मारीस कॉन्व्हेंट(सी.बी. एस.ई) बामणवाडा ची विद्यार्थिनी कु.श्रेया राजू जेनेकर हिचा प्रथम तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी कु.श्रद्धा रामेश्वर ठमके हिने द्वितीय क्रमांक तर अभय मधुकर कोटनाके, स्टेला मारीस कॉन्व्हेंट स्कूल (स्टेट) बामणवाडा ह्या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकाविला. तर आदिवासी गटात प्राथमिक स्तरावर( ६ वी ते ८ वी) जिल्हा परिषद शाळा हरदोना (खु.) येथील कु.ह्रिदीशा किशोर शास्त्रकार हिने आणि माध्यमिक स्तरावर(९ वी ते १२ वी ) अब्दुल गणी पटेल हायस्कूल, देवाडा येथील कु.महिमा संतोष चेन्नुरवार हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. दिव्यांग गटात इन्फंट जिजस कान्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी कौस्तुभ कार्तिक गेडाम ह्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शिक्षकांच्या गटात प्राथमिक विभागातून जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिचबोडीचे शिक्षक श्री बाबा देवराव कोडापे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटातून महर्षी उत्तम स्वामी कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली (खु.) येथील प्रा. प्रशांत माधव परचाके यांनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटसाधन केंद्रातील कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विषय साधन व्यक्ती श्रीमती गीता जांबुलवार यांनी केले.

You cannot copy content of this page