एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सदस्यपदी सागर भटपल्लीवार व नगरसेवक भूपेश मेश्राम यांची नियुक्ती

HomeNewsनागपुर डिवीजन

एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सदस्यपदी सागर भटपल्लीवार व नगरसेवक भूपेश मेश्राम यांची नियुक्ती

गौतम नागरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.५ जुलै राजुरा तालुका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा नुकतीच पार पडली. या सभेसाठी आमदार देवराव भोंगळे यांनी सागर भटपल्लीवार यांचे नाव सदस्य पदावर नामनिर्देशित केले आहे. सोबतच राजुरा नगर परिषद चे नगरसेवक भूपेश मेश्राम यांचे नाव देखील नामनिर्देशित केले आहे. राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या १४ मे २०२६ परिपत्रकानुसार दोघांचे नाव नामनिर्देशित करण्यात आले आहे. या समिती अंतर्गत तालुक्यातील सर्वच विभागांचा समावेश असल्याची माहिती आहे. या समितीची पहिली सभा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. शेवटच्या घटकापर्यंत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे व शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करणार असल्याचे मत नामनिर्देशित सदस्य सागर भटपल्लीवार यांनी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page