गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी राजुरा येथील तहसील कार्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही आणि संविधानाची मूल्ये जपण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
मतदान हा केवळ आपला अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेले महत्त्वाचे कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि संविधानाने दिलेले अधिकार अबाधित राखण्यासाठी प्रत्येक मतदाराने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सुभाषभाऊ धोटे यांनी यावेळी केले.
“लोकशाहीची ताकद मतदारांच्या सहभागात आहे. आपल्या एका मतातून लोकशाही मूल्यांना बळ मिळते. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.


