बिलासपूर येथे गणेश भाऊ पारधी यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदानराष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

HomeNewsनागपुर डिवीजन

बिलासपूर येथे गणेश भाऊ पारधी यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदानराष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
बिलासपूर (छत्तीसगड) :
छत्तीसगडमधील बिलासपूर येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचे युवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गणेश भाऊ पारधी यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर व्यक्ती आणि हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गणेश भाऊ पारधी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते सामाजिक कार्य, जनहिताचे प्रश्न आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सक्रियपणे कार्य करीत आहेत.

या राष्ट्रीय अधिवेशनाला भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. तोखन साहू, जांजगीर-चांपा येथील खासदार श्रीमती कमलेश जांगडे, बिलासपूरचे माजी मंत्री व आमदार श्री. अमर अग्रवाल, आमदार श्री. धर्मजीत सिंह, आमदार श्री. सुशांत शुक्ला, बिलासपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती पूजा विधानी, महाराष्ट्राचे माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, आमदार श्री. दिलीप लहरिया आणि आमदार श्री. अटल श्रीवास्तव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विविध क्षेत्रांतील सामाजिक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणेश भाऊ पारधी यांनी राष्ट्रीय गौरव पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून प्रधान संपादक श्री. तुषार गायकवाड, राष्ट्रीय प्रभारी श्री. ओमप्रकाश वर्मा, राष्ट्रीय उपसंपादक श्री. विजय राम आजाद, छत्तीसगड प्रभारी श्री. कमलेश लल्हाने, संचालक श्री. गौतम बालबिंद्रे, मार्केटिंग प्रमुख श्री. अजय वाहने आणि रायपूरचे संघटन प्रभारी श्री. स्वराज मैथाम यांनी भूमिका बजावली.

राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित होणे ही गणेश भाऊ पारधी यांच्यासाठी अभिमानास्पद उपलब्धी आहे. सामाजिक सेवा, जनहित आणि समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या सन्मानामुळे नवी प्रेरणा मिळणार आहे. गणेश भाऊ पारधी यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समर्थक, सहकारी आणि हितचिंतकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page