जागतिक रेबीज दिन उत्साहात साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

जागतिक रेबीज दिन उत्साहात साजरा.

राजुरा तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात ८५ श्वानांचे मोफत रेबीज लसीकरण.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि. २८ सप्टेंबर जागतिक रेबीज दिनानिमित्त तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, राजुरा येथे दि.२८ सप्टेंबर रोजी विशेष मोफत रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८५ श्वानांना मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
शिबिराचे आयोजन डॉ. नरसिंग तेलंगे , सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. कार्तिक कांगटे, पशुधन विकास अधिकारी, देवाडा, डॉ. भाग्यश्री बेलसरे ,पशुधन विकास अधिकारी, वीरूर स्टेशन, डॉ. दिपक नागले ,पशुधन विकास अधिकारी विस्तार, राजुरा तसेच तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सेवादाते उपस्थित होते. आपुलकी फाउंडेशनच्या टीमनेही शिबिरात सहभाग घेतला. शिबिरादरम्यान सोनिया गांधी येथील शालेय विद्यार्थ्यांना रेबीज लसीकरणाचे प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) देण्यात आले. तसेच रेबीज हा विषाणूजन्य व प्राणघातक आजार असून त्याचा प्रतिबंध, कुत्र्यांचे नियमित लसीकरण, तसेच कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नरसिंग तेलंगे यांनी सांगितले की, “कृषी विभागाइतकेच पशुसंवर्धन विभागाचेही महत्त्व आहे. आगामी काळात दुग्धजन्य व मांसजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून पशुसंवर्धन क्षेत्राला भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी पशुवैद्यक होण्याचे स्वप्न बाळगावे आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे.”
जागतिक रेबीज दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘रेबीजमुक्त समाजासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती’ हा संदेश देण्यात आला.

    You cannot copy content of this page