गौतम नगरी चौफेर (शिवराम पाटील जळगाव)
गणपती बुद्धीचा देव आहे. निर्बुद्ध लोकांनी किडन्याप केला आहे.सुटका करण्याची जबाबदारी धर्म मार्तंड,धर्म पंडितांची आहे.तो पर्यंत गणपतीचा आणि गणेशभक्तांचा छळ होऊ नये म्हणून आपण शासन स्तरावरून प्रयत्न करू शकतो. डी जे वाजवण्यावर बंदी घालू शकतो.
गणेश दर्शन, पुजा, आरती ची ओढ सर्वानाच आहे.पण डी जे च्या कर्कश आवाजाला घाबरून आहेत.कानठळ्या बसवणारा, बहिरा करणारा, हार्ट बीट चुकवणारा आवाज टाळण्यासाठी गणेश दर्शन टाळतात.
गणपती बुद्धीचा देव आहे.तो कुंभकर्ण सारखा झोपलेला नाही.बहिरा नाही.मद्यप्राशन करीत नाही.मांसाहार करीत नाही.तर मग डी जे सारखे राक्षसी वाद्य वाजवण्याची गरज नाही.भक्तीमय वातावरण निर्मिती साठी सनई वाजवणे, मृदंग वाजवणे,टाळ,वीणा वाजवणे पुरेसे आहे.
मुळातच डी जे मुळे कोणत्याही गणेश भक्तांना आनंद होत नाही.दु:ख होते.त्रास होतो.गणेश भक्तांना दुःख देण्यात राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना आसुरी आनंद मिळतो.ते मात्र नार्कोटिक्स घेऊन ,नशा करून,बधीर होऊन नाचतात.पाहातात, कि आम्ही किती न्युशन्स क्रियट करू शकतो.आमचे अस्तित्व,आमचे बळ,आमचा वचक दाखवू शकतो.
ढोल,डी जे हे देवी ,देवता, ईश्वर समोर वाजवण्याची गरज नाही.कोणताही धर्म, कोणताही ग्रंथ,कोणतीही संस्कृती किंवा परंपरा त्याची पुष्टी करीत नाही.म्हणून डी जे वाजवण्यावर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत.उलट धर्माचरण,धर्मभावना विरोधात मानसिकता प्रकट होते.
डी जे मुळे लहान बालकांना,गरोदर महिलांना,जेष्ठ नागरिकांना,रुग्णांना कानात आणि हृदयात त्रास होतो.यास्तव डी जे वाजवण्यास बंदी घालण्यात यावी.कोणालाही परवानगी देऊ नये.
काही अनैतिक प्रवृत्ती चे राजकीय नेते गणपती उत्सवात न्युशन्स क्रियट करणाऱ्या टोळक्यांना स्वताहून देणगी देतात.जेणेकरून त्या नेत्यांचा फोटो गणपती सोबत बैनर वर लावणे,आरती साठी पाचारण करणे,पेपरला फोटो छापून आणणे हा हेतू असतो.अत्याचार,व्यभिचार आणि भ्रष्टाचाराचे पाप झाकण्यासाठी हे असे केले जाते.पण यातून तरूण बिघडतात, गुन्हेगारी वाढते,समाज बिघडतो,उत्सव बिघडतो याचा विचार हे करीत नाहीत.तितकी वैचारिक बुद्धी त्यांना नाही. सुज्ञ नागरिकांनी यापासून अलिप्त राहिले पाहिजे.विरोध केला पाहिजे.
मुळातच लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला तो समाज प्रबोधन व राजकीय जागृती साठी.पण आता त्याचा वापर उलट दिशेने होत असल्याचे जाणवते.तर ही माणसे राजकीय तर नाहीतच शिवाय सामाजिक आणि धार्मिक सुद्धा नाहीत.गैरमार्गाने,अवैध मार्गाने जमवलेल्या पैशांचा वापर समाज,धर्म बिघडवण्यासाठी करीत आहेत.अशा लोकांचा देव, धर्म ,भावना यांचेशी सुतराम संबंध नाही.उलट राक्षसी प्रवृत्ती प्रकट होत आहे.बळावलेली आहे.समाजाच्या मानगुटीवर बसून थयथयाट करीत आहे.यापसून सुज्ञानी सावध राहाणे स्वाभाविक आहे.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
३१/८/२०२६
