चक्क उपोषण मंडपातच बहिणीने भावाला बांधली राखी

HomeNewsनागपुर डिवीजन

चक्क उपोषण मंडपातच बहिणीने भावाला बांधली राखी

श्रीकांत नागदेवे मागील ८ दिवसापासून जिल्हास्तरीय मानधन समिती रद्द करा याकरिता आमरण उपोषणावर
३१ ऑगस्टला ला संगीतमय होणार आंदोलन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा-
राखी म्हटली की बहिण भावाचे अतूट नाते संबंध असते. बहिणीला भाऊ घरी दिसला नाही म्हणून थेट भंडारा येथील जिल्हाधिकारी त्रिमूर्ती( डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात )मागील ८ दिवसापासून जिल्हास्तरीय छत्रपती शाहू महाराज मानधन समिती रद्द करण्यात यावी याकरिता उपोषणाला बसलेले श्रीकांत अंबादास नागदेवे यांची बहीण चक्क भावाच्या उपोषण स्थळी दाखल झाली आणि भावाला राखी बांधली. परंतु जिल्हा प्रशासनाने आमरण उपोषणाची अजून दखल घेतली नाही. त्या निषेधार्थ 31 ऑगस्ट 2026 ला सकाळी ११ वाजता संगीतमय आंदोलन भंडारा येथे सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले आहे. करिता या संगीतमय आंदोलनात सर्व स्तरीय कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संयुक्त कलाकार महासंघाचे अध्यक्ष भावेश कोटांगले ,अमित हारगुडे, उमेश भोयर ,नाशिक चवरे ,पुरुषोत्तम बोंद्रे ,नथू बांते ,सोमप्रभू तांदूळकर , गणेश देशमुख, शाहीर अंबादास नागदेवे, लक्ष्मीकांत मेश्राम गणेश आथिलकर यांनी केलेले आहे.

You cannot copy content of this page