पोलिसांचा आंदोलन कर्त्यावर सौम्य लाठीचार्ज: पाप्पा जाधव यांच्या मुख्य आरोपी व मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : वर्दळीच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी असलेल्या न्यायालयाच्या समोर विनोद ऊर्फ पाप्पा जाधव यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करणाऱ्या मुख्य आरोपीना अटक करून त्यांच्या मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करावे व दोषीना फाशीची शिक्षा देण्याची मागणीला घेऊन शेकडो महिला पोलीस स्टेशन येथे पोहचल्या महिलांना राग अनावर झाल्याने महिलांनी पोलीस स्टेशवर दगडफेक केली व उपविभागीय अधिकारी यांचे वाहन दगडाने फोडले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मृतकाचे नातेवाईक व इतर महिला व पुरुष असिफाबाद – बामणी मार्गावर मृतदेहाचे वाहन रस्त्यावर थांबवून महिलांनी आंदोलन करीत काही वाहतूक थांबविली त्यावेळेस सुद्धा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्तीने आंदोलन मागे घेण्यात आले.



विनोद ऊर्फ पाप्पा जाधव गोळीबार प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाहीत पुन्हा दोन संशयीत ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात सदर घटना जुन्या वैमनश्यातून झाली असल्याचे सांगण्यात आले. ऐन वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजुरा शहरातील न्यायालयाच्या अगदी समोर प्रदीप बिअर बारलगत नारळपाणी विक्रेत्याच्या दुकानात बसलेल्या विनोद ऊर्फ पापा जाधव यांचा जुन्या वादातील राग मनात ठेवून दुचाकीने आलेल्या करण मेकलवार (वय २२) आणि करण बाविसकर (वय २४, दोघेही रा. इंदिरानगर, राजुरा) यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता परवेज सरवर शेख व कार्तिक खामनकर या दोन आरोपीला ताब्यात घेतले असून पुन्हा सखोल तपास केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृतक पाप्पा जाधवनेहमीप्रमाणे मित्रांसोबत बोलत होते. अचानक पाठीमागून आलेल्या करण मेकलवार आणि दीपक बाविसकर यांनी कसलीही खबर लागू न देता त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविले असता त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली. यामध्ये आरोपीनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर कसून चौकशी केली असता. आरोपीनी परवेज सरवर शेख व कार्तिक खामनकर यांचे नाव सांगितले असता त्यांना (दि.२५) पहाटे राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास दुसऱ्या दिशेने केल्यास या प्रकरणाला नविन वळण मिळण्याची चर्चा नागरिकांमध्ये असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली आहे.

पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर व त्यांचे सहकारी करीत आहे.

करण बाविस्कर व करण मेकलवार राहणार इंदिरानगर वार्ड राजुरा
बॉक्स
पोलीस बंदोबस्तामध्ये अंतिम संस्कार
पाप्पा जाधव यांच्या पार्थिवावर (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता पोलीस बंदोबस्तात भवानी नाल्यावरील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
