राजुरा येथे गोळीबारात एक ठार

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा येथे गोळीबारात एक ठार

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : शहरातील न्यायालयाच्या समोर असलेल्या प्रदीप बिअर बार लगत नारियलच्या दुकानात बसून असलेल्या मृतक विनोद ऊर्फ पापा जाधव (वय ३५) मु. सोमनाथपूर यांच्या डोक्यात दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोन युवकांनी बंधूकीच्या गोळया झाडून त्यांची जागीच हत्या केल्याची घटना सायंकाळी ५:३० वाजता घडली आहे.

शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या न्यायालयाच्या विरुद्ध बाजूने असलेल्या प्रदीप बिअर बारच्या बाजूला नेहमी प्रमाणे पापा जाधव मित्रांसोबत बसले होते. यावेळेस आपल्या काही मित्रासह बोलत असताना इंदिरा नगर राजुरा येथिल आरोपी करण मेकलवार (वय २२) व दीपक बाविसकर (वय २४) हे मृतकावर पाळीत ठेवून असताना मृतकाच्या बाजूने येऊन त्यांच्या डोक्यात व छातीमध्ये बंदूक लावून तीन गोळ्या झाडल्या यामध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असता पोलिसांनी घटनास्थळाहुन रुग्णालयात प्रथमचार करिता नेले उपजिल्हा रुग्णालय येथे नेले प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले.

घटनेची माहीती पोलिसांना मिळताच राजुरा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी घटनास्थळ गाठून जमावाला नियंत्रणात आणले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन माहीती जाणून घेतली. घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन शरनागती पत्करली यावेळी पोलिसांनी आरोपीकडून खुणात वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे.

You cannot copy content of this page