पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींचा राजुरा न्यायालयासमोर हल्ला

HomeNewsनागपुर डिवीजन

पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींचा राजुरा न्यायालयासमोर हल्ला

गौतम नगरी चौफेर बादल बेले – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा न्यायालयासमोर आज सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास न्यायालयासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी ‘पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा न्यायालयासमोर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्या दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.गोळीबारानंतर जखमी Vinod Jadhav यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Rajura Court Shooting

या घटनेमुळे राजुरा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील आणि वर्दळीच्या परिसरात गोळीबार झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

You cannot copy content of this page