– शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २३ ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका क्रीडा समितीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूल, बामणवाडा, राजुरा येथे करण्यात आले. या स्पर्धेला शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा संयोजक राजुरा हरिश्चंद्र विरुटकर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, बुद्धिबळ पंच कैलास शेंडे, मुख्याध्यापिका सिस्टर सजिवा डी.एम., सिस्टर जॉएल जोस, सिस्टर लुसी डी.एम. व सिस्टर तेरेसा डी.एम. उपस्थित होते. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बुद्धिबळामुळे एकाग्रता, संयम, तर्कशक्ती, निर्णयक्षमता व नियोजन कौशल्य विकसित होते, असे सांगत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूल, इन्फंट जिझस पब्लिक स्कूल, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, न्यू एरा स्कूल, ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय तसेच कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय, चिंचोली येथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख भास्कर फरकाडे यांनी केले. 14 वर्षा आतील वयोगटात विहांग पिंपळकर, रेयांश सिंगरप, सनथ बंडा, अंश राठोड, कुनाल थेरे, कु. सेजल वानखेडे, संतोषी पवार, निधी वासेकर, केतकी खामनकर, ओवी सातपुते. 17 वर्षाच्या आतील वयोगटात श्रीराम, चेतन, श्रीथान, हर्षवर्धन, सिध्दार्थ बंडा, कु. प्रिन्सी बारई, अक्षरा गोरपाती, आयुष्का चव्हाण, भानुश्री तिवारी, हर्षिता. 19 वर्षाच्या आतील वयोगटात आयुष्य वैरागडे, आयुष्य येथे, ओम उलमाले, आरीझ कु. तन्वी राऊत, मैथिली जेलेवार, प्रगती गोंगले, मनस्वी मरस्कोले, अविका चिंचोलकर या सर्व खेळाडूंची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक हर्शल क्षीरसागर, रोहित रांजेकर, रोहित शर्मा, नेहा श्रीवास्तव, निलम सिंग तसेच स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

