अनु. जाती उपवर्गीकरण विरोधात रिपब्लिकन पक्षाची निदर्शने

HomeNewsनागपुर डिवीजन

अनु. जाती उपवर्गीकरण विरोधात रिपब्लिकन पक्षाची निदर्शने

गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे मुंबई ठाणे दि. 27 जुलै : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे अनु. जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चा, निदर्शने, करण्यात आली.

आंदोलनाचा एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.रिपाईचे केंद्रीय सचिव तथा ठाणे निरीक्षक सुरेश बारसिंग आणि ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ठाणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या प्रसंगी सुरेश बारसिंग म्हणाले की, उपवर्गीकरण रद्द करावे या प्रमुख मागणीसह दलितांच्या विकासासाठी असलेला निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली. या बाबत अधिक स्पष्टीकरण करतांना ते म्हणाले की सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात आला आहे त्याची चौकशी करून संबंधितावर फौंजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे ही बारसिंग म्हणाले.

अनुसूचित जाती उप वर्गीकरण अ ब क ड रद्द करण्यात यावे, जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलकावरील केसेस मागे घेण्यात याव्यात, नीट परीक्षा पेपर फुटी मुळे आत्महत्या केलेल्या विदयार्थ्यांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा विविध मागणीबाबत वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या बाबत आयोजक ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, राज्य सह सचिव राहुल हंडोरे, नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड, सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, मीराभाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर, राज्य युवा अध्यक्ष विनोद थोरात, तात्याराव झेंडे, यांची भाषणे झाली.

या वेळी रिपाई ठाणे शहर अध्यक्ष विनोद भालेराव, ठाणे ग्रामीण अध्यक्ष तेजस जाधव, ठाणे महिला अध्यक्षा विमल सातपुते, उल्हासनगर अध्यक्षा आशा सोनवणे, प्रतिभा कांबळे,टिटवाळा अध्यक्ष विजय भोईर, प्रवीण गायकवाड, प्रल्हाद मगरे, सिद्धार्थ जाधव आदि शेकडो कार्यकर्ते यांनी निदर्शनात भाग घेतला

You cannot copy content of this page