अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचा विस्तार; गोंदिया जिल्हाध्यक्षपदी व्ही. टी. पटले, तर गोरेगाव तालुकाध्यक्षपदी योगेश्वर चौधरी यांची निवड

HomeNewsनागपुर डिवीजन

अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचा विस्तार; गोंदिया जिल्हाध्यक्षपदी व्ही. टी. पटले, तर गोरेगाव तालुकाध्यक्षपदी योगेश्वर चौधरी यांची निवड

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे गोंदिया – अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी आणि संघटनेला ग्रासस्तरावर अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. डॉ. खुशालचंद्र बोपचे यांच्या हिरडामाली येथील निवासस्थानी दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित एका विशेष सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
या नियुक्ती सोहळ्यात सोनी (ता. गोरेगाव) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. व्यासनारायण तेजलाल पटले (व्ही. टी. पटले सर) यांची गोंदिया जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली. तसेच, श्री. योगेश्वर जी चौधरी सर यांची गोरेगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. गणेशभाऊ पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे ओबीसी बहुजन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण जिल्ह्यातून आणि गोरेगाव तालुक्यातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि महासंघाच्या ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाठी हे नवीन नेतृत्व समर्थपणे कार्य करेल, असा ठाम विश्वास डॉ. बोपचे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

COMMENTS

You cannot copy content of this page