महाराष्ट्रातील केसरी कार्डधारकांना मोफत राशन द्या:- वंचित बहुजन आघाडी

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्रातील केसरी कार्डधारकांना मोफत राशन द्या:- वंचित बहुजन आघाडी


गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा –एकट्या साकोली तालुक्यात 15 हजार केसरी कार्डधारक आहेत यामध्ये अतिशय कित्येक लोक गरजू व गरीब आहेत परंतु त्यांच्या त्या कार्डावर अजूनही कोणत्या प्रकारचा राशन  मिळत नाही त्यामुळे अशा महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी केसरी राशन कार्ड धारकलोक आहेत अशा लोकांना मोफत राशन मिळाला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे त्याचप्रमाणे ‘ नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने राबविलेला आहे व तो राबवत आहे ताबडतोब सिलेंडर मिळाला पाहिजे कारण लोक सध्या तरी सिलेंडरचे अभावामुळे जलाऊ काळ्यावर स्वयंपाक करतात व जंगलात जेव्हा काड्या आणायला जातात तर इकडे आमच्या परिसरामध्ये वाघ ,बिबळ हे माणसावर हल्ला करतात त्या दोन लोक मृत्यूमुखी पडले व एक अजून एक जखमी आहे  ते शेतात वावरात जाऊ शकत नाही लाकडा आणू शकत नाही व चूल पेटवू शकत नाही त्यांना सिलेंडर मिळत नाही व मुख्यमंत्री म्हणतो कर सिलेंडरची टंचाई नाही तर मग का बरं नंबर लावल्यावर दुसऱ्या दिवशी सिलेंडर येत नाही 25 दिवस सिलेंडरची वाट बघत राहावे लागते हा अतिशय गरजू आणि गंभीर प्रश्न आहे त्यामुळे तात्काळ दखल घ्यावी या दृष्टिकोनातून आज  वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध मागण्याकरिता एस. डी ओ मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले  महाराष्ट्रातील केसरी कार्डधारकांना मोफत राशन दया, गॅस सिलेंडर च तुटवडा त्वरित दूर करा, जिल्हात गॅस पुरवठा साठी तज्ञ समिती नेमा अशा विविध मागण्या करिता निवेदन देण्यात आले  या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी, साकोली तालुका अध्यक्ष, जगदीश रंगारी, शितल नागदेवे,केवळराम ऊके, जितेंद्र मेश्राम, उत्तमा गडपायले, सचिन रंगारी, राधेश्याम धुळे, नरेंद्र फंदे, मोतीराम मेश्राम, प्रकाश टेंभुर्ण, लीलाबाई रामटेके, कैलास देशपांडे व इतर भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page