जांभळीत झाले नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – साकोली जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी/ सडक येथे (मंगळ. ०७ एप्रिल) ला एक अभिनव उपक्रमात चारसुत्री मेळावा संपन्न झाला. यामध्ये माजी विद्यार्थी संघ मेळावा, पालक मेळावा, नवागत मुलांचा प्रवेश सोहळा व सत्कार सोहळा असे चार सुत्रीय कार्यक्रमांचा पालक जनतेने आस्वाद घेतला हे विशेष.
या कार्यक्रमात अध्यक्ष सरपंच विलास नंदुरकर, प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष हरिभाऊ किरणापुरे, एमपीकेचे प्राचार्य अर्चना बावणे, शाळा व्यव. समिती अध्यक्ष दुलीचंद तिरपुडे, उपसरपंच होमेश्वरी रामटेके, सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम, संदीप खोब्रागडे, श्यामकला गडमडे, ग्रामसेवक रवी खोटेले, उत्तम रामटेके, चंदा कांबळे, शिक्षक गुलाब वल्के, होमराज गणवीर, उपक्रमशील शिक्षक राम चाचेरे, माधुरी राघोर्ते, शिल्पा बोदलकर इत्यादी हजर होते. येथे दिपप्रज्वलन नंतर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश हर्षे यांनी प्रास्ताविकातून कार्यकमाचा उद्देश म्हणजे मुलांच्या भरीव व उच्च दर्जाचे शिक्षण यावर विशेष भर देणे व नवनवीन तंत्रज्ञान उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना बौद्धिक, शारिरीक तथा निर्भिड तयार करणे हे होय असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षिका माधुरी राघोर्ते यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक राम चाचेरे, कैलास गेडाम तसेच विद्यार्थीनी कु. स्वरा हुमणे व कु.आर्वी नागदेवे यांचा गौरव सत्कार करण्यात आला. येथे इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांच्या पालकांचेही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अतिथींचे मार्गदर्शन झाले. पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच मुलांना शिकवावे, मुलांच्या संस्काराकडे लक्ष द्यावे व आपला सक्रिय सहभाग दाखवावा असे त्यांनी भाषणातून व्यक्त केले. यावेळी सर्व चारही समितीचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका अमृता ढोले यांनी तर आभार निशा कटनकार यांनी मानले.


COMMENTS