भंडारा येथे निघाला ओबीसी संघर्ष समितीचा भव्य मोर्चा

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा येथे निघाला ओबीसी संघर्ष समितीचा भव्य मोर्चा

गौतम नगरी चौफेर (भंडारा) – विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार नाना पटोले, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, माजी आमदार चरण वाघमारे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे  यांची प्रमुख उपस्थिती
मोर्चात हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव, संविधान संघर्ष समितीचे कार्यकर्ते, विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित
संजीव भांबोरे संपादक भंडारा – ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी करिता भारतीय राजमुद्रेत जनगणने करिता स्वतंत्र कालम ठेवण्यात यावा अन्यथा ओबीसी समाज जनगणना करणाऱ्या व्यक्तीला परत पाठविणार असा निर्वाणीचा इशारा सदर मोर्चातून देण्यात आलेला आहे. सदर मोर्चाला दसरा मैदान भंडारा येथून सुरुवात होऊन यात विविध ओबीसी संघटना, व विविध सामाजिक संघटना सहभागी होऊन  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला .यानंतर मोर्चाचे त्रिमूर्ती चौक भंडारा येथे जाहीर सभेत रूपांतर झाले. या मोर्चाला ओबीसीच्या अनेक नेत्यांनी संबोधित केले. या मोर्चात प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधान सभेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, माजी आमदार चरण वाघमारे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शविली होती. मोर्चाला संबोधित करताना ओबीसी नेत्यांनी सांगितले की ,आमच्या घरच्या कुत्र्या, मांजरीची, जनगणना होते मग आम्ही माणसं असून आमची का होत नाही ?

भारताच्या राजपत्रात ओबीसीचा स्वतंत्र कालम का नाही !मग आमची भारताच्या राजपत्रात लोकसंख्या कशी कळेल!  आमचे अधिकार हक्क आम्हाला मिळणार कसे? आमच्या मुला मुलींनी गुरे ढोरे राखायची का ?असा प्रश्न उपस्थित केला .यानंतर ओबीसी संघर्ष समिती भंडारा जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा मार्फत भारताच्या महामहीम द्रौपदी मुरमु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मृत्युंजयकुमार नारायण महाप्रबंधक आणि जनगणना आयुक्त भारत सरकार नवी दिल्ली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात यावेळी सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे ,रमेश सहारे, संजय मते, डॉ.बाळकृष्ण सार्वे, रोशन जांभुळकर ,रोशन उरकुडे,भगीरथ धोटे ,उमेश कोराम गोपाल सेलोकर, जयंत झोडे,  मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख वृंदा गायधनी, लता बोरकर, भावना निकुडे,शुभदा झंझाड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आसित बागडे, मनोज बोरकर अमरकंठ बांडेबुचे, अरुण लुटे, राजेश मते ,पुरुषोत्तम बुराडे, बाबूराव मते ,विष्णुदास जगनाडे ,गोपाल देशमुख, रामकृष्ण इलमे, वामनराव गोंधुळे, ग्यानचंद जांभुळकर, समाजसेवक संजीव भांबोरे,असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनी यांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page