विक्रम व्यंकटराव नवरखेडे यांना राष्ट्रपती पदक २०२६ घोषित.

HomeNewsनागपुर डिवीजन

विक्रम व्यंकटराव नवरखेडे यांना राष्ट्रपती पदक २०२६ घोषित.

– साखरी वाघोबा गावात प्रथम आगमना प्रित्यर्थ गावकऱ्यांनी केला भव्य नागरी सत्कार.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १७ मार्च
      साखरी वाघोबा तालुका राजुरा येथील शेतमजूर कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले विक्रम व्यंकटराव नवरखेडे, पोलिस उप निरीक्षक, पेण जिल्हा रायगड यांना भारत सरकारने २६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती पदक पुरस्कार घोषित केला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी  नवरखेडे यांना रायगड जिल्हा पालकमंत्री भारत गोगावले यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते. महामहीम राष्ट्रपती लवकरच त्यांना हा राष्ट्रपती पदक सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. विक्रम यांचे वडील स्व. व्यंकटराव नवरखेडे हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर जन्मगावी झालेल्या प्रथम आगमनाचे औचित्य साधून समस्त साखरी वाघोबा गावकऱ्यांनी नवरखेडे यांचा अतिशय उत्साहात बँड, भजन, दिंडी च्या गजरात स्वागत व सत्कार करण्यात आला. हनुमान मंदिर च्या मागील प्रांगणात झालेल्या सत्कार सोहळ्यात मारोतराव पोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक साखरी (वा.), बळीराम खुजे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पेल्लोरा, प्रणाली मडावी, सरपंच यांच्या हस्ते सपत्नीक शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव गोरे, सेवानिवृत्त सैनिक सुभेदार अनिल चौधरी, ओमप्रकाश नवरखेडे, ॲड. इंजि. प्रशांत घरोटे, संतोष डोंगे, धर्मराज उरकुडे, सुभाष गोरे, मोतीराम गोरे, रामचंद्र लांडे, सुरेश पोडे, तुळशीराम चिकणकर, अक्षय करमणकर, काटवले, मारोती दातारकर, देवराव गोरे, किसन काटवले, पंढरी घटे, सूरज गोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नवरखेडे यांनी अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत व परिसरामध्ये शैक्षणिक सोयी उपलब्ध नसताना  शिक्षण घेऊन  पोलिस खात्यातील नोकरी पत्करून विरूर स्टेशन सारख्या दुर्गम ,नक्षलग्रस्त भागात आपली सुरुवाती सेवा देऊन राष्ट्रपती पदक प्राप्ती पर्यंत झेप घेतली. यात त्यांच्या आणि परिवारा सोबतच  साखरी गावाला सुद्धा सन्मान त्यांनी प्राप्त करून दिला आहे  अशा  भावना व्यक्त करण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना विक्रम नवरखेडे यांनी आपल्या परिवारजन, गावातील मित्रमंडळी, गुरुजन आणि समस्त गावकऱ्याचे आपल्यावर ऋण असून आपण याचे उतराई होण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव व नोकरी सेवेतील नक्षल विरोधी कार्यवाही मध्ये प्रत्यक्ष घेतलेला सहभाग  तसेच नोकरीचे काळात घडलेल्या विविध आठवणीना यावेळी उजाळा दिला.  तसेच गावातील तरुण तरुणींना संबोधित करताना स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्या व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग घेऊन स्वतःचा व समाजाचा विकास करा असे प्रोत्साहित केले. तसेच गावात स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. इंजि.प्रशांत घरोटे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वसंत बोबडे यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page