गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, १२ मार्च
जागतिक महिला दिनानिमित्त नगर पंचायत, कोरपना व युवा प्रतिष्ठान, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने “संघर्षातून यशाकडे – महिला सन्मान सोहळा” हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी आंबेडकर चौक, नगरपंचायत मागे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष नंदाताई विजयराव बावणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शनजी निमकर होते, तर उद्घाटक म्हणून रविंद्रजी शिंदे ,अध्यक्ष, जि. म. सहकारी बँक, चंद्रपूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजयरावजी बावणे, संचालक, जि. म. सहकारी बँक, चंद्रपूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी उत्तम पेचे, माजी जि. प. सदस्य, अशोकराव बावणे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरपना, शामभाऊ रणदिवे, भाऊजी पा. चव्हाण, सुरेश पा. मालेकर, भारतजी चने, रसूल पाटील, इस्माईल शेख,उपाध्यक्ष, नगर पंचायत कोरपना, सुभाष तुराणकर, अविनाश मुसळे, पुंडलिक पा. गिरसावले, केशवराव ठाकरे, राजुरा, राहुल मालेकर, प्रभाकर गेडाम, प्रदीप गुड्डेलीवार, विवेक येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रांत संघर्ष करत यश मिळवलेल्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडण्यात आली. महिलांच्या जिद्द, परिश्रम आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करताना मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. “समाजाच्या प्रगतीत महिलांचा वाटा मोठा आहे. महिलांनी संघर्षातून उभे राहून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे,” असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते.
क्रांतीनाना मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ पैठनीचा हा दिमाखदार कार्यक्रम व सोहळा
‘न्यू होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला, ज्यामध्ये टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरसह विविध बक्षिसे देण्यात आली. याशिवाय डबल डोअर फ्रिज, ४२ इंच एलईडी टीव्ही, मिक्सर ग्राइंडर, शिवण मशीन, कूलर आदी आकर्षक बक्षिसांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या भव्य कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका चारू नितीन बावणे होत्या. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सोबत विशाखा ताई गिरसावले, प्रियंका खनके, प्रिया बावणे, विद्या खाडे, संगीता परसुटकर, सोनाली दूरवटकर, उज्वला धारणकर, टिना गिरडकर, मंजुषा किन्हेकर, किरण हंसकर, मनीषा बांदुरकर, वैशाली ढवस, शीतल जीवने, सुनीता भुसारी, पल्लवी मालेकर, किरण हिरदेव, प्रीती बुटले, अश्विनी अस्वले, गुजाबाई डोंगे, शीतल मालेकर यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोरपना शहरात एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी नंदाताई विजयराव बावणे यांच्या संकल्पनेचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले.

COMMENTS