– आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागाचा निरोप समारंभ संपन्न.
– निसर्गरम्य परिसरात पार पडला निरोप समारंभ.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ५ मार्च
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा जोगापूर वनपर्यटन क्षेत्रातील पाणवठा परिसरात संपन्न झाला. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर बल्की व वनविभाग राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर इंगळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनील मेश्राम, वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र देशकर, वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वनसडी, रूपेश चिडे, स्काउट्स मास्तर, विकास बावणे, वैशाली चिमुरकर , सचिन मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धोटे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांनी तर आभार विकास बावणे यांनी मानले. बेस्ट स्टुडंट्स ऑफ दी इयर म्हणून प्राप्ती पावडे व हिमांशु येवले यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सत्र २०२५-२६ मधील राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्यत्व घेऊन वर्षभर राबविलेल्या उपक्रमातील सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वन भोजनाचा आस्वाद घेतला. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा अंतर्गत वर्षभर पर्यावरण संवर्धन व जनजागृती तसेच क्षेत्रभेट आयोजित करण्यात येते. यामध्ये आदर्श शाळेतील विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात. तर शासनाच्या वतीने निर्देशित प्रत्येक उपक्रम शाळेत राबविण्यात येतो. त्यामुळे भविष्यातील पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांनी यावेळी केले.

——————————————–
बादल एन. बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख आदर्श शाळा, राजुरा
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी सातत्याने राष्ट्रीय हरित सेना विभाग द्वारे विविध पर्यावरण संवर्धन, जनजागृती, पशु पक्षी निरीक्षण व संवर्धन, पर्यावरणपूरक होलिकोत्सव, दीपोत्सव, गणेशोत्सव, वृक्षारोपण, क्षेत्रभेट, सिडबॉल निर्मिती व पेरणी, वृक्षबियांची गोकुळाष्टमी, प्लॅस्टिक निर्मूलन, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात सहभागी विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. अशी माहिती बादल बेले यांनी दिली. याकरिता सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचे व शाळेचे मुख्याध्यापक नलिनी पिंगे, सारिपुत्र जांभुळकर यांचे मार्गदर्शन नेहमी मिळते.
——————————————–


COMMENTS