गौतम नगरी चौफेर – चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी गडचांदुर नगरपरीषद होय, गडचांदुर येथे कृषि उत्पन्न बाजार समिति असल्याने येथे जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो, आधीच कमी उत्पन्न व कर्जाने कंटाळलेल्या शेतक-यांना आपली ऊपजिविका करण्यात अनेक अडचनीचा सामना करावा लागतो, आपली अड़चन दूर करण्यासाठी विविध शहरातून शेतकरी जनावरे खरेदी व विक्री करण्यासाठी येतात, पऱतू आठवडी बाजारात जनावरे घेऊन येणा-या शेतकरी व वाहन चालकांकडून गडचांदूर येथील वाहतूक नियंत्रण पोलीस दिवसाढवड्या अवैध रितया वसुली करायचे मात्र पैसे देण्याची मानसिकता नस्ताना सुद्धा कायद्याच्या भिती पोटी द्यावे लागत असल्याने मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून पोलीस शेतक–यांच्या वाहनाना अडवून बडजबरीने अवैध वसूली करायचे परन्तु शेतक-याची व गडचांदूर शहरातील वाहतुक नियंत्रणाची अडचण लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे सरचिटनीस तथा चंद्रपुर जिला बूरूड समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पटकोटवार यांनी वाहतूक नियंत्रण पोलीस सिपायी है अवैध वसूली करीत असल्या बाबतची लेखी तक्रार मा,पोलीस अधिक्षक सूदर्शन मुमक्का चंद्रपुर यांचे कडे केल्याने वाहतुक नियंत्रण पोलीसानी कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये जनावरे घेऊध येणा–या शेतक-या कडून अवैध वसूली करणे कायम स्वरूपी बंद केल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहें, शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांच्या प्रयत्नाना यश आले असून शेतकरी वर्गात व वाहन चालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हे विशेष


COMMENTS