– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सत्काराचे आयोजन.
गौतम नगरि चौफेर राजुरा २६ फेब्रुवारी –
स्नेहदीप नगर बामणवाडा येथील रहिवासी आणि राजुरा विधानसभा क्षेत्रातील पहिले न्यूरोसर्जन ठरलेले डॉ. आशिष नारायण तेल्कापल्लीवार यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने शॉल, श्रीफळ आणि भारताचे संविधान पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विलास कुंदोजवार, मिलिंद गड्डमवार, शंकरराव बुऱ्हाण, बबलू चव्हाण, शीला जाधव, मनोज तेलिवार, सुजित पोलेवार, सुभाष पिंपळकर आणि तेल्कापल्लीवार यांचे आई वडिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. आशिष नारायण तेल्कापल्लीवार हे राजुरा परिसरातील पहिले न्युरोसर्जन ठरले आहे. त्यांनी नुकतीच कन्याकुमारी शासकीय मेडिकल कॉलेज मधून M.ch. (अति विशेषोपचार न्युरोसर्जन) ही सर्वोच्च पदवी पूर्ण केली आहे. डॉ .आशिष यांचे प्राथमिक शिक्षण सिद्धेश्वर, येरगव्हान आणि देवाडा तालुका राजुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी शिवाजी हायस्कूल राजुरा येथून पूर्ण केले. डॉ. आशिष ने इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. त्यानंतर त्यावेळी नुकतीच चालु झालेली NEET वैद्यकीय प्रवेशाची परीक्षा कोणतेही खाजगी शिकवणी न लावता चांगल्या गुणांनी पास होऊन काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे, येथून त्यांनी एमबीबीएस ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर बी जे ससून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, येथून एम .एस. ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर कन्याकुमारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून M.ch ( Neurosurgeon) ही सर्वोच्च पदवी पूर्ण केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकून डॉ. आशिष ने जे यश मिळवले ते इतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉ. आशिष चे वडील श्री नारायण तेलकापल्लीवार हे सध्या केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि आई गृहिणी आहे.


COMMENTS