गराडा बुज येथे पंचशील बौद्ध विहार समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज उत्सवात

HomeNewsनागपुर डिवीजन

गराडा बुज येथे पंचशील बौद्ध विहार समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज उत्सवात

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील गराडा बुज येथील पंचशील बौद्ध विहार समिती तर्फे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कुमारी पायल चव्हाण हिने मागदर्शन करताना सांगितले की, तरुणांनी ताकदीने एकत्रित येऊन विचारांची शिवजयंती साजरी करावी . महापुरुषांच्या विचारांची कास धरावी, सर्वधर्मसमभावाची भावना आपण आचारात आणली पाहिजे, त्याचबरोबर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मुलांच्या हातातील मोबाईल घेऊन पुस्तके द्यावी. आजची तरुण पिढी शिक्षणाऐवजी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली असते. भविष्यात चांगले घडयायचे असेल तर त्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे. असे मागदर्शन केले.  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आपले जीवन उत्कृष्ट व समाजोपयोगी पद्धतीने घडवावे असा सल्लाही त्यांनी दिला. बुद्ध विहाराचे अध्यक्ष कपूर चव्हाण, विक्की मेश्राम, समीर मेश्राम, साहिल हुमणे, करण मेश्राम, धिरज चव्हाण, समता गोंडाणे, प्रभुजी चव्हाण, सौरभ चव्हाण, अर्पित गोंडाणे हे सर्व उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page