गौतम नगरी चौफेर : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील सहाय्यक शिक्षिका दीपाली घनश्याम पाचभाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेचा आणि गडचांदूर परिसराचा शैक्षणिक लौकिक अधिक उंचावला आहे. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिल चिताडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले आणि पर्यवेक्षिका माधुरी मस्की उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी दीपालीच्या कार्यतत्परतेचे, अभ्यासू वृत्तीचे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या अध्यापन पद्धतीचे कौतुक केले. विज्ञान विषयातील त्यांची सखोल तयारी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत धाबेकर यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती होती.


COMMENTS