– १ लाख ३० हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंता जाळ्यात!
गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर) – महानगरपालिकेतीलच भ्रष्टाचाराचा एक
नमुना उघड झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ‘रमाई शहरी आवास योजने’ तंर्गत लाभार्थ्यांची फाईल मंजूर करण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेत कार्यरत असलेला कंत्राटी अभियंता शुभम वरघाट याने तक्रारदाराकडे त्यांच्या कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी आणि मंजुरी मिळवून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच धडपडणाऱ्या सामान्य नागरिकाकडून एवढी मोठी रक्कम मागितल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने या मागणीबाबत तत्काळ चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि शुभम वरघट सह खाजगी इसम दिनेश दिलीप समद्दर याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, यामागे आणखी कोणाचे हात आहेत काय, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे.

COMMENTS