छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पुण्यश्लोक अहिल्या महिला मंडळ उपक्रम सौ वंदना विनोद बरडे

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ ला  पुण्यश्लोक अहिल्या मंदिर व सभागृह नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आयोजीत करण्यात आली होती. जयंती चा कार्यक्रम उत्साहात उत्सहात पार पडला. हा कार्यक्रम सौ वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्या देवी होडकर महिला मंडळ अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आली.या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक सरस्वती पातोड यांचा व रीना अवजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच महिलांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. आणि शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा प्रत्येकी एक एक गाणे म्हणून शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व महिला मंडळांनी हिरारीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. रोहिणी आवजे, निशा त्रिकूट, ज्योती कापडे, मीनाक्षी लोहि, संजीवनी घुरडे, अश्विणि उरकूडे, यांनी मेहनत घेतली.

COMMENTS

You cannot copy content of this page