गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – १३ फेब्रुवारी संघर्ष युवा विकास मंडळ द्वारे मागील ३१ जानेवारी पासून माननीय हंसराज जी अहिर , पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटित झालेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक,कबड्डी व क्रिकेट स्पर्धांचा समारोप दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी देवराव भोंगळे , आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्याहस्ते बक्षीस वितरणाने झाला. सांस्कृतिक समारोहमध्ये १६ संघानी सहभाग घेतला. आश्लेषा वैरागडवार पाटील व नवीन गोटे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले यात धिडसी संघाला दहा हजार रुपये रोख रकमेचे प्रथम पारितोषिक व सांघिक चषक मिळाले तर द्वितीय व तृतीय स्थानी अनुक्रमे घुग्गुस व खैरगाव हे संघ राहिले.
साखरी वाघोबा करंडकासाठी झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १८ संघांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. रघुवीर अहिर, प्रदेश उपअध्यक्ष भाजयुमो यांचे उपस्थितीत कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या .स्पर्धेत गुरुदेव कबड्डी संघ नांदगाव, यांना वीस हजार रुपये रोख रकमेचे प्रथम क्रमांक, तर जयसेवा ७५० कबड्डी संघ साखरी, यांना दहा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह प्राप्त झाले. धीडशी कबड्डी संघाला पाच हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह चे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. सतीश कुलसंगे , गणेश पिसे, चंद्रकांत लेडांगे, सचिन गोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत, फारुख क्रिकेट संघ वणी यांना,संघर्ष क्रिकेट क्लबच्या विरोधात अतिशय निसटता विजय प्राप्त करण्यात यश मिळाले व तीस हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह अशा प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. संघर्ष क्रिकेट क्लब यांना रूपये वीस हजार रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह तर रॉयल क्रिकेट क्लब राजुरा यांना तृतीय पुरस्कार प्राप्त झाला.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या बक्षीस वितरण समारोहात डॉ. भागवत रेजिवाड, गट विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा, मेंढे मॅडम पंचायत समिती राजुरा, मंडळाचे अध्यक्ष राजू घरोटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कावळे, वामन तुरानकर, हरीदास झाडे, सुरेश रागीट, प्रशांत साळवे,अंकुश गोरे, रत्नाकर जेणेकर,संतोष उरकुडे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना आमदार महोदयांनी ग्रामीण भागातील एक मंडळ मागील पंचेवीस वर्षांपासून अविरत सामाजिक,शारीरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,कृषी व वेकोली प्रकल्पग्रस्तांच्या क्षेत्रात कार्यरत असल्याबद्दल विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. प्रशांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात,सुदर्शन बोबडे, चंद्रकांत लेडांगे,अमोल डेरकर, मिथुन काटवले, राहुल उरकुडे, राकेश उरकुडे,दुर्गेश्वर लांडे,सूरज गोरे,महेश मडावी, अंकुश अडबाले,सचिन मिलमीले,अक्षय जेणेकर, मयूर वरारकर,अमोल अडबाले, राहुल घरोटे,प्रमोद रंभाजी, रमेश करमनकर पीयूष पोडे, प्रज्वल चोथले व सर्व पदाधिकारी व सदस्य तथा साखरी गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
वेकोली पोनी गौरी उपक्षेत्र प्रबंधनाचे या संपूर्ण आयोजनासाठी विशेष सहकार्य राहिले.


COMMENTS