तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत काम बंद आंदोलन.

HomeNewsनागपुर डिवीजन

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत काम बंद आंदोलन.

मापकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी काम बंदठी आंदोलन. दोन दिवसांपूर्वी महिलेचा  विनयभंगाची केल्याची चर्चा. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सचिव अनिल भोयर निलंबित.

गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार भंडारा/तुमसर :- शहरातील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे विदर्भातच नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे येथे महिला व पुरुष रोजंदारीने काम करत असतात तसेच आज एका मापकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठिय्या आंदोलन केले असता,मोठी पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आली व तसेच  समितीने तातकाळ बैठक बोलावून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.परंतु येथील एका कर्मचाऱ्यांनी मापकाच्या सहमतीने महिलेचा विनयभंग केल्याची चर्चा असून सदर महिलेने तुमसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दि. ६ फरवरीला केली होती त्यात सचिव अनिल भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला प्रकरणाचे गांभीर्य पाहून संचालक मंडळाने त्याला करणे दावा नोटीस दिला असता त्याच्या खुलासा हि त्यांनी केला परंतु दि.११ला सर्व कर्मचाऱ्यांनी महिलेविरुद्ध ठिया आंदोलन केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी शिस्तभंगाची कारवाई करत त्याला एक महिन्यासाठी पुढील आदेशापर्यंत निलंबित केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page