गौतम नगरी चौफेर (विनोद खंडाळे गडचांदूर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोराचा उपक्रम संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा 2026 च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे साजरी करण्यात आली. गुरु रविदासांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीने आंबेडकर चौकात पहिल्यांदाच साजरी केल्यामुळे समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्वप्रथम आयु. वसंत लिपटे सर आणि आयु. यशवंत सायरे सर यांनी गुरु रविदास महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करून दिपप्रज्वलन केले. याप्रसंगी बोलताना आयु.वसंत लिपटे सर यांनी रविदासांच्या काळात असलेली बहुजन समाजाची स्थिती आणि गुरु रविदासानी मनुवाद्याशी केलेला संघर्ष उपस्थितसमोर मांडला आणि संतांनी केवळ जातीव्यवस्थेवरच प्रहार केले नाही तर समाजातील लोकांना सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला असे विचार व्यक्त केले.त्याचप्रमाणे आयु. यशवंतराव सायरे सरांनी गुरु रविदासांचे विविध दोहे समजावून सांगितले आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु रविदास यांच्या विचारातील साम्य समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ऍड. रोशन नकवे यांनी केले तर आभाप्रदर्शन समितीचे अध्यक्ष आयु. राजूभाऊ तांबेकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाला श्री. संभाजी लांडगे, सौं. मनीषाताई लांडगे, सौं. रेखाताई लिपटे, श्री. प्रशांत बेंडे, श्री. दिलीप लिपटे सौं. सुगंधाताई लिपटे, श्री. विनोद खोब्रागडे, श्री.चंद्रप्रकाश चावरे, श्री. रामभाऊ लांडगे, सौं. मीनाताई लांडगे श्री. रमेश लांडगे आणि चर्मकार समाजातील सुमारे चाळीस ते पन्नास महिला व पुरुष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी आंबेडकरी विचाराचे बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.


COMMENTS