गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदूर : शेतकरी संघटना, कोरपना तालुक्याच्या वतीने दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६, स्थळ – ओम भवन, कोरपना, वेळ – दुपारी ०१ वाजता गडचांदूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. निलेश ताजने यांच्यासह गडचांदूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अश्विनी कांबळे, सारिका डोर्लीकर, महेश आवारी यांचा तसेच राजुरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. दिलीप देरकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. रमेश नळे, नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील मोहुर्ले, जुबेर शेख व स्वीकृत नगरसेवक किशोर हिंगाने यांचा सत्कार समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामनराव चटप होते. तर मधुसूदन हरणे (स्व. भा. प. प्र. अध्यक्ष), सतीश दानी (यु. आ. माजी प्रदेशाध्यक्ष), अरुण नवले (शे. स. जि. अ.), निळकंठ पा. कोरांगे (स्व. भा. प. जि. अ.), ॲड. श्रीनिवास मुसळे (ता. अ. शे. स.), ॲड. दीपक चटप (प्र. यु. आ.), रमाकांत पा. मालेकर, सुनील बावणे (जि. उ. शे. स.), रवी गोखरे (माजी प. स. सभापती), नरेश सातपुते (ता. अ. यु. आ.), गणपत काळे, प्रवीण गुंडावार व अनिल कौरासे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. धनराज गोटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सत्कार समारंभास सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासात्मक कामे राबवावीत, असे आवाहन केले. शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शेतकरी संघटनेचे आभार मानत जनतेच्या अपेक्षांनुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सत्कार समारंभाला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS