आवाळपूर  ते गाडेगाव  रस्त्यावर पडलेले खड्डे.

HomeNewsनागपुर डिवीजन

आवाळपूर  ते गाडेगाव  रस्त्यावर पडलेले खड्डे.

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – गडचांदूर पोलिस हद्यित येत असलेल्या आवाळपूर ते गाडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, आवागमन करताना वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आवाळपूर येथील सरपंच प्रियंका दिवे, गाडेगाव येथिल सरपंच गिताताई राजुरकर, कल्पतरू कन्नाके, बंडुजी निरांजने, विनोद राजुरकर, दौलत झाडे, संदिप लोहे, सुरज मुठलकर, कमलाकर राजुरकर, किशोर टोंगे, विठ्ठल शेळामे, सुरेश दिवे, अविनाश चौधरी, राहुल मत्ते, युधिष्टर मासीरकर आदीनी  केली आहे.

आवाळपूर ते गाडेगाव हा मुख्य रस्ता अंदाजे तिन किलोमीटर लांबीचा आहे. परंतु, या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले असून, अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, संबंधित बांधकाम विभागाने आणी लोकप्रतिणिधीनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आवाळपूर व गाडेगाव येथिल नागरिकांनी केली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page