१० वर्षांपासून वर्षांपासून दुर्लक्ष; रस्त्याची झाली चाळणी
गौतम नगरी चौफेर (शिला धोटे आवारपूर) – या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, हा शेतकरी, कामगार तसेच मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था – पाहता प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने – घसरून अपघात होत आहेत. अपघातांमध्ये जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. ‘अधिकारी फिरकत नाहीत, रस्ता दुरुस्ती होत नाही, ‘अशी संतप्त प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गडचांदूर ते आवाळपूर – सांगोडा – फाटा हा महत्त्वाचा असलेला जोडरस्ता गेल्या १० वर्षांपासून पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित ती विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
गडचांदूर ते आवाळपूर ते सांगोडा फाटा-गाडेगाव-फाटा या रस्त्याची गेल्या १० वर्षांपासून चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात पात होत असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. तातडीने नव्याने रस्ता बनवावा. सागर बोरकर, बंडू निरांजने सामाजिक कार्यकर्ते, आवाळपूर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तातडीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
COMMENTS