गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कालचा दिवस दिनांक 8 डिसेंबर 2025 सोमवारी अत्यंत चुरशीचा आणि उत्साहाचा ठरला .स्पर्धेतील अनेक प्रमुख खेळांचे अंतिम सामने काल पार पडले असून विजेत्या संघावर शिक्कामोर्तब झाले आहे. काल दिवसाची सुरुवात सकाळी 8 वाजता अथलांटिक मधील ४x100 मीटर आणि ४x४०० मीटर रिले पुरुष व महिला शर्यतींनी झाली . तसेच सकाळी 8 वाजता भंडारा येथील क्रीडा संकुलात पुरुषांची जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली. सांघिक खेळांच्या अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडा नैपुण्य दाखविले. हॉकीचे सामने सकाळी परेड ग्राउंडवर खेळविण्यात आले. दुपारच्या सत्रात चैतन्य ग्राउंडवर फुटबॉल व हँडबॉल ची अंतिम सामने झाले. तर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, बास्केटबॉलच्या सामन्यांची रंगत पाहायला मिळाली. दिवसाचा समारोप सायंकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये कुस्ती (पुरुष व महिला) स्पर्धेच्या अंतिम फेरीने झाला . काल संपन्न झालेल्या सांघिक खेळाची अंतिम निकाल खालील प्रमाणे आहेत. पुरुष विभाग, हाकी प्रथम क्रमांक चंद्रपूर, द्वितीय भंडारा, तृतीय वर्धा, फुटबॉल प्रथम नागपूर ग्रामीण, द्वितीय चंद्रपूर, तृतीय वर्धा, हँडबॉल प्रथम भंडारा, द्वितीय वर्धा, तृतीय गोंदिया, व्हॉलीबॉल प्रथम गोंदिया, द्वितीय चंद्रपूर, तृतीय गडचिरोली, बास्केटबॉल प्रथम वर्धा, द्वितीय भंडारा, तृतीय चंद्रपूर, खो-खो प्रथम गडचिरोली, द्वितीय चंद्रपूर, तृतीय नागपूर ग्रामीण ,कबड्डी प्रथम नागपूर ग्रामीण, द्वितीय चंद्रपूर ,तृतीय गडचिरोली ,महिला विभाग व्हॉलीबॉल प्रथम गोंदिया, द्वितीय क्रमांक गडचिरोली ,तृतीय वर्धा ,बास्केटबॉल प्रथम भंडारा, द्वितीय गडचिरोली ,तृतीय चंद्रपूर, खोखो प्रथम गडचिरोली , द्वितीय भंडारा, तृतीय चंद्रपूर, कबड्डी प्रथम गडचिरोली ,द्वितीय चंद्रपूर, तृतीय भंडारा ,या स्पर्धेत सर्व जिल्ह्यांच्या खेळाडूंनी अटीतटीची लढत दिली. विशेषता गडचिरोली आणि चंद्रपूरच्या संघांनी अनेक खेळांमध्ये अंतिम फेरीत धडक मारत आपले वर्चस्व सिद्ध केले .तर यजमान भंडारा जिल्ह्याने हँडबॉल (पुरुष) आणि बास्केटबॉल (महिलांमध्ये) सुवर्णपदक पटकविले.




COMMENTS