कोरपणा उडान पुलावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंतीदिनी नामकरणाचे फलक झळकावले

HomeNewsनागपुर डिवीजन

कोरपणा उडान पुलावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंतीदिनी नामकरणाचे फलक झळकावले

गौतम नगरी चौफेर कोरपणा – कोरपणा येथील निर्माणधिन व कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय महामार्ग 353 B, सप्टेंबर 2025 पासून नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित झाले. या उडान पुलाला व चौकाला महापुरुषाचे नाव देण्यात यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव सय्यद
आबिद अली यांनी 25 मे, 2025 ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मुख्याधिकारी यांना पत्र देऊन चौफुली चौकाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक व उडानपुलाला भारतरत्न युवांचे प्रेरणास्थान डॉ.एपी.जे अब्दुल कलाम नामकरणची मागणीचा पाठपुरावा केला होता. कोरपणा नगरपंचायतचे उपाध्यक्ष यांनी दिनांक 19.09.2025 च्या सर्वसाधारण सभेत ठराव विषयसूचीवर ठेवण्याची मागणी दिनांक 28.08.2025 ला केली. यावरून नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 3 नुसार चर्चा आयोजित करून नामफलक लावण्याची मंजूर प्रदान करून प्रकल्प प्रमुख राज्यमार्ग प्राधिकरण यांना प्रस्ताव दिला होता. गावकऱ्यांची मागणी व नामकरण डॉ.एपी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी फलक लावून आनंद साजरा केला. कोरपणा येथे चौफुली ला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व उडान पुलाला भारतरत्न डॉ. एपी.जे अब्दुल कलाम नामफलक पुलावर झळकले. यामुळे यापुढे शिवाजी चौक बस स्टँड कोरपणा व भारतरत्न डॉ.एपी.जे अब्दुल कलाम उडान पूल असे संबोधन केल्या जाणार आहे. नगर पंचायतचे सत्ताधारी व विरोधक यांनी सर्वानुमते नामकरणाला पाठिंबा दर्शविला हे विशेष

You cannot copy content of this page