गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, ता.प्र. – शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिनांक 3 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राम मंदीर सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले. स्व.शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. या शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी ॲड. मुरलीधर देवाळकर, उपनगराध्यक्ष दिलीप डेरकर, नगरसेवक रमेश नळे व किशोर हिंगाने, ॲड.दिपक चटप, शेषराव बोंडे, दिलीप देठे, दिनकर डोहे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, कपील इद्दे, नरेंद्र काकडे, अमोल देवाळकर, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, खुशाल अडवे, सुरज गव्हाणे, निखिल बोंडे, मारोती लांडे, पांडूरंग पोटे, समाधान लडके, रामदास कोहपरे, बंडू कोडापे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रक्त संकलनाच्या कार्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य केले.


