श्री शिवाजी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण.

HomeNewsनागपुर डिवीजन

श्री शिवाजी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२७ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ च्या निमित्ताने युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गतराष्ट्रीय सेवा योजना आणि मेरा युवा भारत (MY Bharat) यांच्या वतीने आयोजित ‘Khelo India Samvaad – Khel Ki Baat PM Ke Saath’ या राष्ट्रव्यापी युवा सहभाग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश देशातील युवकांना भारताच्या वाढत्या क्रीडा संस्कृतीशी जोडणे तसेच क्रीडा क्षेत्राचे भवितव्य, युवा नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मिती याबाबत युवकांमध्ये संवाद निर्माण करणे हा आहे. यावेळी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनपर संबोधनाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ. आर. आर. खेरानी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू प्रदीप राठोड व क्रीडा प्रशिक्षक वर्षा कोयचाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू प्रदीप राठोड व क्रीडा प्रशिक्षक वर्षा कोयचाडे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमधील संधी, खेळाची तयारी, नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती तसेच खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या पोषक आहाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या विविध योजना, धोरणे व खेळाडूंना उपलब्ध असलेल्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधींबरोबरच खेळातून विकसित होणारे नेतृत्वगुण, शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. भारताला २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि युवकांना विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभागी करून घेणे या उद्दिष्टांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, मेरा युवा भारत, चंद्रपूरचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page