अबब… राजुरा पोलिसांनी जप्त केल्या तिन अग्निशस्त्र
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, ता.प्र. राजुरा शहरात पापा जाधव यांचा राजुरा न्यायालयासमोर भर दिवसा गोळ्या घालून खून झाल्यानंतर पोलिस सतर्क झाली असून पहिल्यांदाच पोलिसांनी अटक झालेल्या आरोपींनी सुगावा दिल्यानुसार दिनांक २६ ऑगस्ट रोजी दोन अग्निशस्त्र व दिनांक २७ ऑगस्ट रोजी एक अग्निशस्त्र असे एकुण तिन अग्निशस्त्र जप्त केले आहे. बामणवाडा ते चुनाळा रेल्वे मार्गावर याच गुन्ह्यातील आरोपींनी झुडपात लपवून ठेवलेल्या दोन अग्निशस्त्र व आज आरोपीच्या मित्राकडे एक अग्निशस्त्र मिळाले. आतापर्यंत एकुण ४ अग्निशस्त्र जप्त करण्यात आली असून यामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राजुरा हे अग्निशस्त्राचे भांडार तर झाले नाही ना, असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे या अग्निशस्त्र सोबत ४ जिवंत काडतूस मिळाले आहेत. ही चारही अग्निशस्त्रे मध्य प्रदेशच्या सीमेवरून आल्या असल्याची माहिती ठाणेदार यांनी दिली. दरम्यान अन्य आरोपीचा शोध राजुरा पोलिस करीत असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन त्यांच्या राजुरा शहरात वाढती गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राजुरा शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदन दिले. यावेळी अविनाश जाधव, महादेव तपासे, जनार्दन निकोडे, राजु गौरशेट्टीवार उपस्थित होते.

