सत्कारानंतरच ‘जुलूस’; राजुऱ्यात जपली जातेय एकतेची परंपराईद-ए-मिलाद नबी निमित्त पोलिसांकडून मौलाना, जामा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान; पोलिसांचाही सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

सत्कारानंतरच ‘जुलूस’; राजुऱ्यात जपली जातेय एकतेची परंपराईद-ए-मिलाद नबी निमित्त पोलिसांकडून मौलाना, जामा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान; पोलिसांचाही सत्कार

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा :
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी अनोखी परंपरा राजुरा शहरात अनेक वर्षांपासून जपली जात आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या जुलूसाला सुरुवात करण्यापूर्वी राजुरा पोलिसांकडून शहरातील विविध मशिदींचे मौलाना, जामा मशीद समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार केला जातो. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार झाल्यावरच जुलूस काढला जातो.

बुधवारी (दि. २६) ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राजुरा पोलिस ठाण्यातर्फे हा उपक्रम पार पडला. पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक कोमल घाडगे, पडोळे मॅडम,फौजदार किशोर तुमराम, पोलिस हवालदार विकी निर्वाण, सकपाल गेडाम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी राजुरा जामा मशिदीचे मौलाना साबीर रजा नुरी, मौलाना दिलदार रजा, मौलाना सुलेमान चाऊस, मौलाना ख्वाजा कुरेशी, हाफिज हाश्मी अहमद, हाफिज मतलब रजा, हाफिज फारूक सिद्धीकी यांचा पोलिस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच जामा मशीद समितीचे अध्यक्ष शाहिद अहमद यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.

यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. परस्पर सन्मान आणि विश्वासाचे हे वातावरण निर्माण झाल्यानंतरच ईद-ए-मिलादचा जुलूस मार्गस्थ झाला.

धार्मिक उत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

राजुरा शहरात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ठरत आहे. पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध समाजघटकांमध्ये संवाद व विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.

यावेळी हाजी नसीरुल्ला बेग, हाजी सलीम हडप्पा, हाजी सय्यद सखावत अली, हाजी करीम शेख, मूर्तजा बेग, बाबा बेग, शब्बीर खान पठाण, अब्दुल तलजीन कुरेशी, अब्दुल रहीस, नेहाल अहमद रिझवी, कलाम कुरेशी, मुजीब बेग, शौकत हुसेन कुरेशी, सय्यद इरफान, इर्शाद बेग, सय्यद इमाम, आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

राजुरातील ही परंपरा ‘उत्सवापूर्वी सन्मान आणि सन्मानानंतर एकतेचा संदेश’ देणारी ठरली असून, सामाजिक सलोख्याचे एक सकारात्मक उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

You cannot copy content of this page