भारतवाडा येथे चैताली भस्मे यांचा “संविधान दीप सन्मानाने ” गौरव

HomeNewsनागपुर डिवीजन

भारतवाडा येथे चैताली भस्मे यांचा “संविधान दीप सन्मानाने ” गौरव

गौतम नागरी चौफेर संजीव भांबोरे नागपूर – श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ आणि VBN TV  यांच्या  संयुक्त विद्दमाने गोविंद लॉन अँड बँकेट हॉल  भारतवाडा, नागपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले .या समारंभात  समाजात उल्लेखनीय  कार्य  करणाऱ्या विशिष्ट व्यक्तींचा ” संविधान दीप सन्मान ” म्हणून गौरव करण्यात आला सर्पमित्र, प्राणीमित्र, वन्यजीव रक्षक आणि मांगल्य फाऊंडेशन च्या अध्यक्षा व संस्थापिका चैताली भस्मे यांच्या समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल ” संविधान दीप सन्मान पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. २००५ पासून ते आजपर्यंतच्या अखंड निस्वार्थ समाजसेवा , प्राणिसेवा, आणि निसर्ग सेवेसाठी चैताली भस्मे यांना सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी श्रमजीवी ग्रामीण पत्रकारसंघ संस्थापक  महेश ठाकूर सोनी ,आयोजक  प्रदेश अध्यक्ष व संपादक प्रदीप बॅनर्जी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते

COMMENTS

You cannot copy content of this page