गौतम नगरी चौफेर (मुक्ताईनगर | ३० ऑगस्ट २०२६ :लोकनेते मा. एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगर येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास जी आठवले साहेब यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या आगमनप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर राव भटकर, जिल्हा महासचिव निळकंठ सोनोने, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष संतोष राव वानखेडे, जळगाव जामोद शहराध्यक्ष सिद्धार्थ वानखेडे तसेच महिला जिल्हाध्यक्ष रोशनी ताई कबीरदास यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय वाटचालीचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला रामदास आठवले साहेबांची उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खडसे साहेबांना अमृत महोत्सवी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
