गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – येथील नवनिर्माणधिन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेने केलेली आहे. सविस्तर वृत्त असे की,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार होते. त्या निवडणूक निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पदस्पर्श जिल्ह्यांना झालेला आहे. ती निवडणूक संविधान सभेत जाण्यासाठी बाबासाहेब यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाची होती त्यामुळे बाबासाहेबांनी संपूर्ण क्षेत्र अक्षरता पिंजून काढणे व या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण गावातील लोकांना बाबासाहेबांना बघण्याचा व त्यांना ऐकण्याचा योग आला. काही कारणास्तव बाबासाहेब या निवडणुकीत निवडून येऊ शकले नाही. परंतु बाबासाहेबांचे आधुनिक भारताच्या विकासाच्या दृष्टीने मांडलेले विचार भारतभर पसरले.

पुढे पश्चिम बंगाल मधून निवडून येऊन त्यांनी अहोरात्र परिश्रम करून भारताच्या संविधानाची निर्मिती केली. भारताला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचा, पुरस्कार करणारी धर्मनिरपेक्ष घटना मिळाली. या घटनेवर आधारित भारत भविष्याकडे वाटर करीत आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्यांनी भारताच्या पायाभरणी तो निघतेचे बीज रोवले. त्यामुळे या विज्ञाननिष्ठ महामानवाचे नाव भंडारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावे. वरील मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, भंडारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रवीण थुलकर, उपाध्यक्ष सुदेश वैद्य, महासचिव मनोज बनसोड, कोषाध्यक्ष महेंद्र वाहने, कायदेविषयक सल्लागार महेंद्र गोस्वामी, सचिव आम्रपाली गजभिये यांच्यामार्फत देण्यात आले.


COMMENTS