गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे घटनाबाह्य उपवर्गिकरण करण्याचा घाट घातला आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये भेदभाव, स्पर्धा व अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये. त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुर्ण ताकदीने विरोध करणार आहे. बाबासाहेबांनी आपणाला जात धर्म विरहित बौद्ध धम्म दिला असून येणाऱ्या जनगणनेत बौद्धांनी बौद्ध धम्म तसेच पाली भाषेची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रत्येक तालुकाचे पदाधिकारी यांनी आपल्या तालुक्यात सुरू असलेल्या पक्षाचे कामाची माहिती दिली. काम करण्यास येणार्या अडचणी सांगितल्या. मेळाव्यात वर्ष भर करण्यात येणार्या कामाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा स्तरावर ढोस निर्णय घेवून कार्यकर्ता सक्रिय व अपडेट ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तारीख २६ एप्रिल २०२६ ला दुपारी ०२:०० वाजता स्थळ- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे हे होते.

मेळाव्याला जेष्ठ व नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस गोपाळ रायपूरे, माजी जिल्हाध्यक्ष बाजीरावजी उंदीरवाडे, नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा महासचिव प्रा. डॉ. रविंद्रनाथ पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष गुरूदास रामटेके, युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ उपरे, नंदा रामटेके, सरिता लोणारे, उज्वला नगराळे, संतोषभाई रामटेके, आनंद जगताप, डी.जी. दुर्गे, हंसराज ताकसांडे इत्यादीने पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यातील गावागावात जाऊन गावं तिथे शाखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

COMMENTS