गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा २५ एप्रिल
पशुसंवर्धन विभाग राजुरा अंतर्गत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय राजुरा येथे जागतिक पशुवैद्यकीय दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग पंढरीनाथ तेलंगे ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुक्यातील श्वानांचे मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास डॉ.भाग्यश्री बेलसरे ,पशुधन विकास अधिकारी विरुर स्टेशन, डॉ. दीपक नागले, पशुधन विकास अधिकारी विस्तार राजुरा , पशुधन पर्यवेक्षक परमेश्वर राठोड,आदित्य बोबडे, अनिल चव्हाण व तालुक्यातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर शिबिरात शंभरपेक्षा जास्त श्वानांना मोफत लसीकरण करण्यात आले. सदर रेबीज लसीकरण करण्यामागे महत्त्वाचे उद्देश म्हणजे राजुरा तालुक्यातील गाय वर्ग ,म्हैस वर्ग व शेळी वर्ग तसेच सर्व मोकाट व पाळीव श्वानांना रेबीज या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करणे हे होते. यावेळी श्वान प्रेमींनी मोठ्यसंखेने अँटी रेबीज लसीकरण शिबिराचा लाभ घेतला.
——————————————–
कोट
डॉ. नरसिंग तेलंगे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय राजुरा
पशुवैद्यक केवळ औषध देणे, उपचार करणे इतकेच न करता पशुपालकांना नियमित मार्गदर्शन करत असतात. जनावरांच्या संगोपनातील बारकावे , व्यवस्थापन , आहार व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपचार , उपाय याबाबतीत पशुपालकांमध्ये जागृती करत असतात. आजच्या जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा करताना आपण आपल्या कर्तव्याचा ही विचार करायला हवे असे प्रतिपादन डॉ. नरसिंग पंढरीनाथ तेलंगे यांनी यावेळी केले.
——————————————–




COMMENTS