एसटी प्रवास महागला – १५ एप्रिलपासून १०% लागू

HomeNewsनागपुर डिवीजन

एसटी प्रवास महागला – १५ एप्रिलपासून १०% लागू

श्रीकृष्ण देशभ्रतार  “गौतम नगरी चौफेर”  भंडारा/तुमसर :- ता. १० राज्य परिवहन महा मंडळाकडून (एसटी) प्रवाशांना धक्का देणारा निर्णय घेण्यात आला असून, १५ एप्रिलपासून साध्या बससेवेच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ १५ जूनपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महामंडळाच्या माहितीनुसार, उन्हाळा व दिवाळी या गर्दीच्या काळात दरवर्षी भाडेवाढ केली जाते. यंदाही त्याच पार्श्वभूमीवर ही वाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ फक्त साध्या बससेवेसाठीच असून, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी व शयनयान यांसारख्या भाड्यात प्रीमियम बससेवांच्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, स्वच्छता सुधारण्यासाठी एसटीकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे. या निधीतून बसस्थानके, बसेस व कार्यालयांची दररोज स्वच्छता करण्यात येणार असून, लवकरच बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. स्वच्छतेचा संपूर्ण खर्च एसटी महामंडळ स्वतः उचलणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एसटी सोबत सुरक्षित प्रवास असा संदेश देत प्रवाशांनी या बदलांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page