३.०१ कोटींच्या वसुलीने तुमसर पालिकेने रचला इतिहास.

HomeNewsनागपुर डिवीजन

३.०१ कोटींच्या वसुलीने तुमसर पालिकेने रचला इतिहास.

श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर”भंडारा/तुमसर :- शहर विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या मालमत्ता कर वसुलीमध्ये तुमसर नगर परिषदेने यंदा ‘ऐतिहासिक’ कामगिरी बजावली आहे. नगराध्यक्ष सागर मनोहर गभने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ कोटी १९ लाखांच्या एकूण मागणीपैकी ३ कोटी १ लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला असून, ७२.२७ टक्के वसुलीचा विक्रमी टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील ज्या मोठ्या ‘मातब्बरांकडे’ लाखोंचा कर थकीत होता, त्यांनीही यंदा कर भरून प्रशासनाला सहकार्य केले आहे.

या मोहिमेदरम्यान एकीकडे कर निरीक्षक कमलेश कुंभरे हे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून ‘मौन’ बाळगत असल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती देण्याबाबत कुंभरे यांची ही ‘पळकाढू’ भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरली असतानाच, नगराध्यक्ष सागर गभने यांनी स्वतः आकडेवारी जाहीर करून पारदर्शकतेचा परिचय दिला. अखेर या प्रशासकीय ओढाताणीनंतर का होईना, पण वसुलीचा आकडा ऐतिहासिक ठरला आहे. टीम वर्कचे यश ही मोहीम प्रभारी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजित पद्धतीने राबवण्यात आली. कर निरीक्षक कमलेश कुंभरे यांच्यासह वरिष्ठ लिपिक सुनील मेश्राम, जमील शेख, नसीर आम्ही पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभारावर भर दिला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच कर भरून शहराच्या विकासात योगदान दिले आहे. या ऐतिहासिक वसुलीसाठी संपूर्ण कर विभाग आणि कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. सागर मनोहर गभने, नगराध्यक्ष, नगर परिषद तुमसर अली आणि त्यांच्या संपूर्ण कर वसुली पथकाने प्रत्यक्ष मैदानावर उतरून ही मोहीम फत्ते केली. मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी या पथकाने घेतलेले परिश्रम आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले आहे. विकासाचा मार्ग आता मोकळा ३ कोटींहून अधिकचा निधी जमा झाल्याने आता शहरातील रखडलेल्या विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या नागरी सुविधांसाठी आता निधीची कमतरता भासणार नाही.

COMMENTS

You cannot copy content of this page