– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमित्त.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ८ एप्रिल
सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे यांच्या वतीने तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम दि. ७ एप्रिल रोजी सकाळी विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस. बी. गाडगे होते. तर प्रमुख अतिथी राजेश मांढरे, सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला अध्यक्षा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, अरुणा सालवटकर, संघमित्रा ताकसांडे तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी तसेच सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे उपस्थित होते. याप्रसंगी वर्ग ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नोटबुक व पेनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले, सचिव नामदेवराव बोबडे तसेच सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघमित्रा ताकसांडे यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी उमरे यांनी तर आभार जीवन आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी अथक परिश्रम घेतले.



COMMENTS