जागतिक क्षयरोग दिनी अल्ट्राटेक कम्युनिस्टी वेलफेअर फाऊंडेशन, आवळापूर तर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

जागतिक क्षयरोग दिनी अल्ट्राटेक कम्युनिस्टी वेलफेअर फाऊंडेशन, आवळापूर तर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

गौतम नगरी चौफेर (देविदास मांदाळे) – जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च दिनाचे औचित्य साधुन आरोग्य विभाग व अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर  यांचा संयुक्त विधमाने कोरपना तालुक्यातील 11 क्षयरोग रुग्णांना सहा महिने करिता पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यात आले .
संपूर्ण भारत देश क्षयरोगमुक्त होण्याच्या अनुषंगाने माननीय प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री निश्चय रोग मित्र योजना सुरू केली असून यामध्ये समाजातील दानशूर प्रतिष्ठित समाजसेवी तसेच कॉर्पोरेट कंपनीतील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR फंडाच्या माध्यमातून गरीब दुर्बल क्षयरोग् क्षयरोग पीडित रुग्णांना प्रोटीन युक्त आहार्किट वापराच्या सूचना आहेत त्यामध्ये डाळी, शेंगदाणे, मोठ, तेल, सोयाबीन वड्या अशा अनेक प्रोटीन युक्त पदार्थ वाटप करण्याबाबत सूचना आहे जेणेकरून शहर रुग्णांना ते उपचारांसोबतच त्यांना सकस आहार भेटून त्यांचा आजार लवकर बरा होईल हा त्या मागचा उदात्त हेतू आहे.
क्षयरोगामध्ये प्रामुख्याने भूक मंदावणे सतत ताप व खोकला राहणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजनामध्ये घट होणे, संध्याकाळी येणारा घाम ही प्रमुख लक्षणे असून याचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावर होते व निदानंतर पूर्ण उपचार घेतल्यावर हा पूर्णपणे बरा होतो.
कोरपणा तालुक्यात सध्या क्षय रुग्ण उपचाराखाली 64 रुग्ण असून अल्ट्राटेक सिमेंट सी.एस.आर. गावातील एकूण 11 टीबी रुग्ण आहेत व त्या अकरा ही टीबी रुग्णांना अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने सहा महिन्यासाठी दत्तक घेतलेले आहे.
सदर कार्यक्रमात मा. डॉ. स्वप्नील टेंभे सर तालुका आरोग्य अधिकारी, कोरपना व जिवती यांनी रुग्णाला क्षयरोग उपचार, DBT , या विषयी मार्गदर्शन केले तसेच रुग्णांना दत्तक घेतल्या बाबत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे  आभार मानले.
उपस्थित अल्ट्राटेक कम्युनिस्टी वेलफेअर  फाऊंडेशन चे CSR प्रमुख श्री. किरण करमरकर सर, Occpational थेरपी सेंटर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खिरटकर सर, प्राथमिक आरोग्य  केंद्र नांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत शेंडे सर, श्री. राजेश हिरेमठ STLS, श्री वाघमारे सर, आरोग्य सहायक नांदा, श्री देविदास मांदाळे सर कोर्डिनेटर उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page