मोहफुल वेचायला गेलेला वसंता मेश्राम यांचा  वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

HomeNewsनागपुर डिवीजन

मोहफुल वेचायला गेलेला वसंता मेश्राम यांचा  वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

मृत्यूच्या कुटुंबांना 50 लाख व एकाला नोकरी द्या, वंचित बहुजन आघाडी

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा- साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथिल रहिवाशी वसंता गणेश मेश्राम वय 49 हे मोहफुल वेचण्याकरिता दिनांक 19 मार्च 2026 ला पहाटेच्या सुमारास जंगलामध्ये गेले असता सकाळी 8 वाजेच्या दरम्यान पाठीमागून वाघाने झेप घेऊन मोफत वेचत असलेल्या वसंता मेश्राम याला 1 किलोमीटरपर्यंत त्या व्यक्तीला फरकळत नेले त्यात त्यांच्या मृत्यू झाला त्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्या ठिकाणी फॉरेस्ट एफडीसीएम अमोल नागे, ए सी एफ व्हि डी पाटील, यांनी घटनास्थळाला भेट देऊन भेट दिली व 10 लाखाचा चेक व 20 हजार रुपये अंत्यसंस्काराकरता दिले. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि  पोलीस डिपार्टमेंट यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. मृतकाचे साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रसंगी याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी सुद्धा वन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणून मध्यस्थी करून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे व वंचित चे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी सुद्धा भेट देऊन एकाला नोकरी देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे वारसांना  50 लाखाची मदत देण्यात यावी, वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. सदर घटनेमुळे परिसरामध्ये लोक भयभीत झालेले आहेत. यावेळी  वंचित चे यादोराव गणवीर, गणेश गजभिये, जोसना खोब्रागडे, गीता वलथरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page