संदीप शेंडे यांच्या “आदिईहग” नवोपक्रमाला प्रथम क्रमांक

HomeNewsनागपुर डिवीजन

संदीप शेंडे यांच्या “आदिईहग” नवोपक्रमाला प्रथम क्रमांक

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे नागपूर – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26 ची नागपूर विभाग व जिल्हास्तरीय फेरी नुकताच पार पडली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर द्वारा जिल्हास्तरीय प्राथमिक गटातून संदीप शेंडे यांच्या “आदिईहग” या नवोपक्रमाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल दिनांक 17 मार्च 2026 रोजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नागपूर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हर्षलता बुराडे प्राचार्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी संदीप शेंडे यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच नितीन इसोकर, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती काटोल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लाडगाव येथील मुख्याध्यापक दिलीप गलगट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच लाडगाव आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

You cannot copy content of this page