– नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीचे आयोजन.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१७ मार्च राजुरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीताताई पथाडे यांच्या पुढाकाराने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरुण धोटे होते. तर उद्घाटन उपनगराध्यक्ष दिलीप देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती गीताताई पथाडे, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, नगरसेवक रमेश नळे तसेच मार्गदर्शक म्हणून ॲड. योगिताताई रायपुरे व डॉ. अभिलाषा गावतूरे उपस्थित होते. कार्यक्रमात नगर परिषद राजुरा येथील महिला पदाधिकाऱ्यांचा शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती पुनम गिरसावळे तसेच नगरसेविका वज्रमाला बतकमवार, संध्या चांदेकर, इंदुबाई निकोडे, फरीना शफीक सय्यद, निता बानकर, मयुरी पहानपटे, मंगला मोकडे व पौर्णिमा सोयाम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. तसेच महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. उपस्थितांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.
प्रास्ताविकेतून सभापती गीताताई पथाडे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत महिला सक्षमीकरणासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले. यावेळी समूह नृत्य स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक टीम फिटनेस क्लब, द्वितीय रजनी बुटले ॲन्ड ग्रुप, तृतीय रुक्मिणी ग्रुप तसेच पाककला स्पर्धेत प्रथम सरिता मुरलीधर वरवाडे , द्वितीय साक्षी संभाशिव भाके, तृतीय सोनाली कुणाल मोकडे यांनी क्रमांक पटकावला. कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



COMMENTS